धुळे -जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 218 वर पोहोचली असून आत्तापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या 1 हजार 553 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकाच दिवसात चार जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी (दि. 24 जुलै) दुपारी चार वाजेपासून ते सोमवारी (दि. 27 जुलै) सकाळी आठ वाजेपर्यंत टाळेबंदी करण्यात घोषित करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यात 24 जुलैपासून पुन्हा 'लॉकडाऊन'
धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार दुपारी चार वाजेपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. या काळात केवळ भाजीपाला, किराणा दुकान व वैद्यकीय सुविधा सुरू असणार आहेत.
धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा वाढत आहे. यामुळे एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. कोरोनाचा फैलाव झाल्यापासून एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असून ही बाब शहर आणि परिसरासाठी धोकेदायक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 218 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 90 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 553 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 575 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
धुळे शहर आणि परिसरात दररोज सरासरी 60 याप्रमाणे नवीन बाधित रुग्ण आढळून येत आहेत. यात ग्रामीण भागही मागे राहिलेला नाही त्यामुळे मृतांची संख्या शहरासोबत ग्रामीण भागातही वाढत असून आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाची साखळी खंडीत होऊन बाधितांची संख्या कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दुपारी चार वाजेपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. यात भाजीपाला, किराणा दुकाने तसेच मेडिकल वगळता अन्य सर्व आस्थापने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी संजय यादव जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.