धुळे- साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गालबोट लागण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. साक्री नगरपंचायतीचे प्रभाग क्रमांक 11 चे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले. त्यानंतरच्या वादामध्ये पराभूत उमेदवाराच्या बहिणीची मृत्यू झाला. गुन्हेगारांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.
साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या ( Sakri grampanchayat election dispute ) निकालानंतर भाजपच्या काही नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 11 मधील विजयी उमेदवार ( Sakri ward number 11 candidate ) आणि शिवसेनेचे पराभूत उमेदवार यांच्या परिवारातील सदस्य यांच्यात शाब्दिक चकमक झाले. एकमेकांच्या अंगावर गेल्यानंतर ( Clashes between Shivsena and BJP leaders in Dhule ) पराभूत उमेदवाराच्या बहिणीने बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांना भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारांकडून जबरदस्त मारहाण करण्यात आली. त्यात महिला गंभीर जखमी होऊन मृत झाल्याची प्राथमिक माहिती समोर ( woman death after sakri grampanchayat election ) येत आहे.