महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुरत-नागपूर महामार्गावर कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात; एक जण ठार - एक जण ठार झाला

शहराजवळील सुरत-नागपूर महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्याने दोघा व्यक्तींची ओळख पटू शकली नाही. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघातग्रस्त कार आणि दुचाकीचे छायाचित्र

By

Published : Jun 15, 2019, 7:07 PM IST

धुळे- शहराजवळील सुरत-नागपूर महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्याने दोघा व्यक्तींची ओळख पटू शकली नाही. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघातग्रस्त कार आणि दुचाकीचे दृष्य


धुळे शहराजवळील सुरत नागपूर महामार्गावर, डी एन क्यू ३७३१ क्रमांकाची मारुती कार सुरतवरुन अक्कलपाडा गावाकडील वळण रस्त्यावरुन धुळ्याकडे जात होती. त्याचवेळी बाईकवर २ व्यक्ती धुळ्याहून साक्रीकडे जात होते. या दरम्यान कार आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. यात मोटारसायकलवरील एकाला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होता.


या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मदतकार्य करीत जखमीला तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवले. या अपघातातील दुसऱ्या जखमीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details