एसटी बसचा ब्रेक फेल...चालकाचे प्रसंगावधान...थरार सीसीटीव्ही कैद - driver
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळेनेर गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावर नाशिकहून नंदुरबारकडे जाणारी परिवहन मंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाले. टोल नाक्यावर समोर एक कार टोल गेटकडे जात असतानाच बस चालकाने प्रसंगावधान राखत बस दुभाजकावर नेत रस्त्याच्या बाजूला नेली व काही अंतरावर गेअरच्या सहाय्याने वाहनावर नियंत्रण मिळविले. चालकाचे जर लक्ष नसते व त्याने नियंत्रण मिळविले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. ही बाब तेथील सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाली आहे.
ब्रेक फेल
धुळे - साक्री तालुक्यातील पिंपळनेर टोल नाक्याजवळ परिवहन महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे भीषण अपघात टळला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या बसमध्ये जवळपास ६० पेक्षा जास्त प्रवासी होते. या घटनेमुळे परिवहन महामंडळाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
Last Updated : Feb 12, 2019, 8:28 PM IST