धुळे- महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. धुळे जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 60.03 टक्के मतदान झाले. मतदानानंतर आता उमेदवारांच भवितव्य मतपेटीत बंद झालं असून येत्या 24 तारखेला काय निकाल लागतो? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
धुळे जिल्ह्यात 60.03 टक्के मतदान - maharashtra election live
धुळे जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 60.03 टक्के मतदान झाले. मतदानानंतर आता उमेदवारांच भवितव्य मतपेटीत बंद झालं असून येत्या 24 तारखेला काय निकाल लागतो? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - धुळ्यातील देवपुरामध्ये पोलिसांचा छापा; ५० हजार रोख रक्कमेसह पिस्तूल जप्त
धुळे जिल्ह्यात 8 लाख 68 हजार 537 पुरुष, 8 लाख 14 हजार 706 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी धुळे जिल्ह्यात 1 हजार 695 मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते. या ठिकाणी 9 हजार 963 अधिकारी आणि कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर मतदानासाठी 203 बस, 252 जीप, 152 क्रुसर, 15 ट्रकसह 652 वाहनांचा वापर करण्यात आला. सायंकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
- साक्री - 59.77
- धुळे ग्रामीण - 64.35
- धुळे शहर - 49.40
- शिंदखेडा- 60.99
- शिरपूर - 65.00