धुळे -जिल्ह्यातील साक्री परिसरात गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. शनिवारी या अक्कलपाडा धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अक्कलपाडा धरणातून विसर्ग सुरु हेही वाचा - नांदेडच्या विष्णुपूरी धरणातून एक तास पाण्याचा विसर्ग
२ दिवसांपासून धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री माळमाथा परिसरात दमदार पाऊस सुरु आहे. यामुळे या भागातील जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यामुळे अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग पांझरा नदीत सुरु करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. शनिवारी अक्कलपाडा धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रातन जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान सतत सुरु असलेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
हेही वाचा - तोतलाडोह धरण भरल्याने नागपुरकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले