धुळे- शहरातील आझादनगर भागात संचारबंदीदरम्यान बाहेर बसलेल्या टवाळखोर तरुणांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धुळ्यातील आझाद नगर भागात जमावाकडून पोलिसांवर दगडफेक - धुळे लॉकडाऊन
धुळे शहरातील आझाद नगर भागातील शाळा क्रमांक 25 येथे जमलेल्या जमावाला हटवण्यासाठी गेलेल्या आझाद नगर पोलीस ठाण्यातील पथकावर 10 ते 12 लोकांनी दगडफेक केली. ही घटना शनिवारी दुपारी घडली. यात कोणीही जखमी झाले नसून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी संशयितांची धरपकड सुरू असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.