महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

शिरपूर तालुक्यातील रुंदावली गावातील रहिवासी बाळू पाटील या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवारी सकाळी आत्महत्या केली.

अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

By

Published : Feb 2, 2020, 11:58 AM IST

धुळे -जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रुंदावली गावातील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा, अतिवृष्टीत पिकांचे झालेले नुकसान यामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली. बाळू गुलाबराव पाटील (वय 35) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

पाटील यांनी धुळे जिल्हा बँकेचे पीककर्ज, ठिबक सिंचनचे कर्ज तसेच काही वैयक्तिक कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेतून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

हेही वाचा - 'अर्थसंकल्पात लघु उद्योग आणि कुटीर उद्योगांना चालना द्यावी'

आज (रविवार) सकाळी 7 च्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात विष प्राशन करून त्यांनी जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, प्राथमिक शिक्षण घेणारा मुलगा, मुलगी आणि वयोवृद्ध आई-वडील असा परिवार आहे.

हेही वाचा -चारित्र्याच्या संशयातून विवाहितेची हत्या, फोन करून पतीनेच दिली माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details