धुळे : दोंडाईचा शहरातील शिवाजी नगर भागातील दोन सख्या भावांनी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील एका गावातील ४५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून दरवाजा बंद करून, पीडित महिलेचे तोंड दाबून, पीडित महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून नग्न करून दोघा भावांनी आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केला आहे.
Crime News : 45 वर्षीय महिलेवर दोन सख्या भावांचा आळीपाळीने बलात्कार; पीडितेच्या गुप्त भागावर सिगारेटचे चटके - Dandai Police Station
Dhule Crime: पीडित महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून, नग्न करून दोघा भावांनी आळीपाळीने पीडितेवर जबरी संभोग करून बलात्कार केला.
जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार: तसेच हाताबुक्यांनी, काठीने मारहाण करून आरोपीने पीडितेच्या गुप्त भागावर हाताने मारून, सिगारेटचे चटके देऊन पीडितेस जातीवाचक शिवीगाळ करून अश्लील भाषा वापरली आहे. तसेच पीडितेस जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून पीडित महिलेने दोंडाईचा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार दोघा नराधम भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल: या प्रकरणात भादंवि कलम अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कलम ३ (१)(आर)(एस)३(१)(डब्ल्यू)(i)(ii)३(२)(५-अ),भादंवि कलम ३७६ (ड), ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी अटक नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना २७ मार्च २०२१ या दिवशी दुपारी १२ वाजेनंतर घडली आहे. १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी रात्री उशिरा दोंडाईचा पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाला आहे.