धुळे- राजस्थान राज्यातील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळे आगारातून विशेष बस सोडण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील 1 हजार 800 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणले जाणार आहे.
राजस्थानमध्ये अडकलेले विद्यार्थी परतणार.. धुळ्यातून 91 बसेस रवाना - लाॅकडाऊन बातमी
महाराष्ट्रातील 1 हजार 800 विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी गेले होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन लागले. त्यामुळे विद्यार्थी तेथेच अडकून पडले. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी धुळे आगारातून 91 बसेस सोडण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-Global COVID-19 Tracker: जगभरात ३१ लाख ३८ हजार बाधित, तर २ लाख १७ हजार ९८५ दगावले
महाराष्ट्रातील 1 हजार 800 विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी गेले होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन लागले. त्यामुळे विद्यार्थी तेथेच अडकून पडले. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी धुळे आगारातून 91 बसेस सोडण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सोडण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.