धुळे- साक्री तालुक्यातील ८० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या ५ वर पोहोचली आहे.
धुळ्यात ८० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू - 80 year old died dhule
मृत रुग्ण हा शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाचा उपचार घेत होता. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या २५ आहे.
हिरे वैद्यकीय महाविद्यालय
मृत रुग्ण हा शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाचा उपचार घेत होता. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या २५ आहे. दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३ कोरोनाबाधित रुग्णांची अवस्था चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
हेही वाचा-राजस्थानमध्ये अडकलेले विद्यार्थी परतणार.. धुळ्यातून 91 बसेस रवाना