महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात पाच वर्षाच्या मुलीसह ७ महिलांना कोरोनाची लागण, रुग्णसंख्या ६२ वर

शहरातील काही कोरोनाबाधित महिला एसआरपी जवानांच्या नातेसंबंधातील नगावबारी परिसरातील असल्याचे समजते.नुकतेच चिमठाणे येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

corona in dhule
corona in dhule

By

Published : May 13, 2020, 10:02 AM IST

धुळे - पाच वर्षाच्या मुलीसह ७ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 62 झाली आहे. शहरातील काही कोरोनाबाधित महिला एसआरपी जवानांच्या नातेसंबंधातील नगावबारी परिसरातील असल्याचे समजते.नुकतेच चिमठाणे येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६२वर पोहचली असून शहरात आतापर्यंत सर्वाधिक ५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अहवालावरून समजते.

धुळे शहरात सोमवारी ८ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. परंतु ते ८ ही रुग्ण भांडुप मुंबई येथील असल्याचे समजते. तसेच काही दिवसांपूर्वी कोव्हीड रुग्णालयातून पसार झालेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अद्यापपर्यंत सापडले नसून पसार झालेले पॉझिटिव्ह रुग्ण हे आपल्या घरी पोहचले असून ते घरीच क्वारंटाईनमध्ये असल्याचे समजले.

धुळे जिल्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेड झोनमध्ये आला आहे. नुकतेच धुळे पोलीस अधीक्षक यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लोकांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले व नागरिकांनी योग्य ते सहकार्य केले. आपले शहर व जिल्हा लवकरच रेड झोनमधून बाहेर पडेल, अशी नागरिकांनी आशा व्यक्त केली. परंतु मंगळवारच्या वाढत्या कोरोनाबाधित आकड्यांवरून नागरिक योग्य ते सहकार्य करत नसल्याचे दिसत आहे. घरी बसूनच आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो म्हणून नागरिकांनी घरी बसा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details