धुळे- साक्री तालुक्यातील विजयपूर गावात अंगावर वीज पडून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. 1 जून) रात्री घडली. सुरज अहिरे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सोमवारी रात्री धुळे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. या पावसात विजयपूर येथे राहणाऱ्या ५ वर्षीय सुरजच्या अंगावर वीज पडली. यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेत सुरजची आईला देखील विजेचा धक्का बसला असून सुदैवाने त्यांचा जीव वाचला.