धुळे - गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाईनमध्ये असलेले ५ जण पोलिसांना चकवा देऊन पळाल्याची घटना घडली आहे. पळून जाणारे पाच जण राजस्थान येथील आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.
धुळ्यातून क्वारंटाईन असलेले ५ जण पळाले, राजस्थानचे होते रहिवासी - धुळ्यातून ५ जण पळाले
हैदराबाद, जुन्नरवरून प्रवास करून राजस्थान येथे जात असलेल्या ५५ परप्रांतियांना धुळ्यातील पिंपळनेर येथे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अपर तहसीलदारांनी ५५ जणांना वाणी मंगलकार्यालयात क्वारंटाईन केले होते. त्यापैकी ५ जणांनी पोलिसांना चकमा देऊन पलायन केले. त्यांच्याविरोधात पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उमरपाटा मंडळ अधिकारी आर. एल. पवार यांनी सांगितले.
देशात कोरोनाची महामारी सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून २१ दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यानंतर ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. त्यामुळे परराज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर त्याचठिकाणी अडकले आहेत. त्यामुळे अनेकजण आपल्या गावी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. असेच हैदराबाद, जुन्नरवरून प्रवास करून राजस्थान येथे जात असलेल्या ५५ परप्रांतियांना धुळ्यातील पिंपळनेर येथे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अपर तहसीलदारांनी ५५ जणांना वाणी मंगलकार्यालयात क्वारंटाईन केले होते. त्यापैकी ५ जणांनी पोलिसांना चकवा देऊन पलायन केले. त्यांच्याविरोधात पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उमरपाटा मंडळ अधिकारी आर. एल. पवार यांनी सांगितले.