धुळे - हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून आणखी 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधित 10 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत 47 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दिलासादायक बातमी; धुळ्यातील 47 जण झाले कोरोनामुक्त - कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज
कोरोनाबाधित 10 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. यामुळे धुळेकरांना काहीसा दिलासा देखील मिळाला आहे.

संग्रहित छायाचित्र
सोमवारी दुपारी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच धुळेकरांमध्ये चिंता वाढली होती. परंतु रात्री कोरोनावर मात करत दोन दिवसांत तब्बल 22 जणांनी कोरोनावर उपचार घेऊन रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. यामुळे धुळेकरांना काहीसा दिलासा देखील मिळाला आहे. तूर्तास धुळेकरांना दिलासा जरी मिळाला असला, तरी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.