धुळे -शहरातील कुमारनगर भागात राहणाऱ्या एका चार वर्षीय बालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. लव्यम रेलन असे या बालकाचे नाव असून मंगळवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांमधून वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील कुमारनगर भागात असलेल्या एका विद्युत खांबामधून वीज प्रवाहित होत असल्याची तक्रार नागरिकांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीकडे केली होती. यामुळे एखाद्या नागरिकाचा मृत्यू होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, तक्रार करून देखील वीज वितरण कंपनीने याची दखल घेतली नाही.