धुळे- शहरातील हिरे सर्वोपचार रुग्णालयातून ४ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात एका ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. लवकरच उर्वरित रुग्णांना देखील घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
धुळ्यात ४ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत; ७० वर्षीय महिलेनेही कोरोनावर दिली मात - 4 corona patient discharge dhule
डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचे टाळ्या वाजवून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत रुग्णालय प्रशासनाच्या वतीने निरोप देण्यात आला.
जिल्ह्यात ३२ जण कोरोनाबाधित आढळून आले असून आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित २६ जणांवर हिरे सर्वोपचार वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. यापैकी ४ जणांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यावेळी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचे टाळ्या वाजवून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत रुग्णालय प्रशासनाच्या वतीने निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे, यात शिंदखेडा तालुक्यातील एका ७० वर्षीय महिलेचा देखील समावेश आहे. उर्वरित रुग्णांना देखील लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा-धुळे आरोग्य प्रशासनाचा पुन्हा गलथान कारभार... नातेवाईकांना दिला दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह....