धुळे- शहरातील महाकाली मंदिराजवळ एका 35 वर्षीय व्यक्तीची अज्ञातांनी हत्या केली आहे. दगडाने ठेचून क्रुरतेने ही हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना संबंधित व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपाधिक्षक सचिन हिरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते.
35 वर्षीय व्यक्तीची हत्या... दगडाने ठेचल्याचा प्राथमिक अंदाज - धुळे पोलीस बातमी
धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथील एका कुरियर दुकानात काम करणारा जितेंद्र शिवाजी मोरे हा रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही.
35 वर्षीय व्यक्तीची हत्या...
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब सह श्वानपथक दाखल झाले होते. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांना जितेंद्रचा मृतदेह आढळला होता. जितेंद्र हा कुरियर दुकानात काम करत होता. हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.