महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काळजी घ्या..! शेंगदाणे खाणे बेतले जीवावर, धुळ्यात तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू - धुळ्यात चिमुकलीचा मृत्यू

शिरपूर शहरातील पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीचा अन्ननलिकेत शेंगदाणे अडकल्याने मृत्यू झाला आहे. सृष्टी भरत ठाकरे असे या चिमुरडीचे नाव असून शेंगदाणे गिळल्यावर तिला श्वासनाचा त्रास होऊ लागला; आणि श्वास गुदमरल्याने ती दगावल्याचे समोर आले आहे.

3 year old child died in dhule
शिरपूर शहरातील पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीचा अन्ननलिकेत शेंगदाणे अडकल्याने मृत्यू झाला आहे.

By

Published : Feb 28, 2020, 12:46 PM IST

धुळे - शिरपूर शहरातील पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीचा अन्ननलिकेत शेंगदाणे अडकल्याने मृत्यू झाला आहे. सृष्टी भरत ठाकरे असे या चिमुरडीचे नाव असून शेंगदाणे गिळल्यावर तिला श्वासनाचा त्रास होऊ लागला; आणि श्वास गुदमरल्याने ती दगावल्याचे समोर आले आहे.

शिरपूर शहरातील पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीचा अन्ननलिकेत शेंगदाणे अडकल्याने मृत्यू झाला आहे.

सकाळी सृष्टीने सकाळी भाजलेले शेंगदाणे खाण्यास घेतले. ते खात असताना तिला अचानक ठसका आला. त्यामुळे शेंगदाणे तिच्या अन्ननलिकेत गेले. यानंतर सृष्टीला श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होऊ लागला. तिच्या मावशीला हे समजताच सृष्टीला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सृष्टीची आई शिरपूर बस आगारामध्ये वाहक पदावर काम करते. तर वडील शेतकरी आहेत.

शिरपूर शहरातील पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीचा अन्ननलिकेत शेंगदाणे अडकल्याने मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details