धुळे: मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मजूरांच्या वाहनाला भिषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर बाकीचे जखमी झाले. 15 जखमी मजुरांना नरडाणा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू - Mumbai-Agra Highway worker Accident
सेंधवा मध्यप्रदेश येथून काही मजूर शेतात काम करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. ते माघारी जात असताना त्यांच्या वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर बाकीचे जखमी झाले.
![मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू Accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8287648-412-8287648-1596523870219.jpg)
हे सर्व मजूर सेंधवा मध्यप्रदेश येथून शेतात मजूरी कामासाठी महाराष्ट्रात आले होते. चालत्या वाहनाचे टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच नरडाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी योगेश राजगुरू यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृत व जखमी मजूरांना बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच शिरपूरचे आमदार काशिराम पावरा हे घटनास्थळी दाखल झाले. आमदार पावरा यांनी घटनेची चौकशी करून माहिती घेतली. याबाबत मजुरांच्या कुटुंबांना माहिती देण्याचे काम सुरू आहे.