महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे: दुचाकी आणि ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू - धुळ्यातील ट्रक आणि दुचाकीचा अपघात

तीन तरुण दुचाकीने चाळीसगावहून धुळेमार्गे सेंधवा गावाकडे काम शोधून पुन्हा घराकडे परतत होते. धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या चौदा चाकी ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात या तिघांचाही मृत्यू झाला.

अपघात
अपघात

By

Published : Aug 10, 2020, 3:10 PM IST

धुळे - तालुक्यातील विंचूर गावाजवळील पुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कामाच्या शोधात बाहेर पडलेले तरूण घराकडे परतत असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे. प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन तरुण दुचाकीने चाळीसगावहून धुळेमार्गे सेंधवा गावाकडे काम शोधून पुन्हा घराकडे परतत होते. धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या चौदा चाकी ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात या तिघांचाही मृत्यू झाला. पेवा नानला चौहान (वय २८), श्यामलाल बरकत खरते (वय ३० रा.शिवन्या ता. सेंधवा जि. बडवानी) व कानसिंग कसा रावत (वय १९ रा. भामपुरा ता. सेंधवा जि. बडवानी, मध्यप्रदेश) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

अपघाताच्या आवाजाने ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी असलेल्या तिघांना रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून तिघांना मृत घोषित केले. प्रकरणी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी बरकत जिरला खरते (५३, रा शिवन्या, ता. सेंधवा जि. बडवानी) यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details