महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

28 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाविरुद्ध धुळ्यात गुन्हा दाखल - Dhule rape News

28 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध ठेवून तसेच तिच्या वडिलांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. नामदेव वसंत आव्हाड (रा. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 10, 2019, 1:23 PM IST

धुळे -28 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध ठेवून तसेच तिच्या वडिलांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिकच्या तरुणासह त्याच्या कुटुंबियांविरुध्द धुळ्यामध्ये बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


नामदेव वसंत आव्हाड (रा. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. नामदेव याने एकदा लग्न झालेले आहे. मात्र, त्याने ही माहिती लपवून ठेवत पीडित तरुणीची आणि तिच्या कुटुंबियांची फसवणूक केली.

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात संततधार; गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू


नामदेव आव्हाड याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी नाशिक, अमळनेर, जेजुरी, धुळे येथे तरुणीशी शारीरीक संबंध ठेवले. तिच्या सोबतचे फोटो मोबाईलवरुन प्रसिध्द करुन तिची व कुटुंबाची बदनामी केली. नामदेवच्या कुटुंबियांनी संगनमत करुन तरुणीच्या वडिलांकडून 4 लाख रुपये घेतले.
28 वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन नामदेव वसंत आव्हाड, वसंत गणपत आव्हाड, मंदाबाई वसंत आव्हाड, नवनाथ वसंत आव्हाड, मनिषा नवनाथ आव्हाड यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details