धुळे- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या वाढत असून सोमवारी तब्बल 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 275 वर पोहोचली आहे.
सोमवारी धुळे जिल्ह्यात 27 रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या संख्येसह बांधितांची संख्या 275 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 123 जणांनी कोरोनावर मात केली असून 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात वाढती कोरोना बधितांची संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. शिरपूर तालुक्यात 71 कोरोना बाधित रुग्ण असून यामुळे शिरपूर तालुका हॉटस्पॉट ठरत आहे.
प्रशासनाने व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बाजारपेठेत शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे, यावर प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोमवारी (ता.८) दिवसभरात आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण -
- धुळे शहरात - 7
- दोंडाई शहर - 9
- शिरपूर शहर - 11
हेही वाचा -धुळे : शहरातील मंदिरे उघडली, नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन
हेही वाचा -धुळ्यात आढळला पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ नाग; सर्पमित्र सोडणार निसर्गाच्या सान्निध्यात