धुळे - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची होणारी वाढ चिंतेत टाकणारी आहे. आज (शुक्रवार) सकाळी 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 2 कोरोना संशयितांचा मृत्यू झाला होता. आता प्राप्त अहवालानुसार साक्रितील आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने धुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २१ वर गेली आहे. त्या 2 करोनाग्रस्तांवर हिरे शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
सकाळी तीन जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. या तिघांमध्ये धुळ्यातील एकाचा समावेश आहे. शिरपूर तालुक्यातील अमोदे आणि साक्री येथील एक असे दोघे कोरोनाबाधित असल्याचे आढळले होते. आता त्यात भर पडली असून साक्रीतील अजून दोन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ३० संशयितांचे स्वॅब अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी २८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
धुळे जिह्यात कोरोनाबधितांचा आकडा पोहोचला 21 वर - corona news
धुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची होणारी वाढ चिंतेत टाकणारी आहे. आज (शुक्रवार) दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ वर गेली आहे.
धुळे जिह्यात कोरोनाबधितांचा आकडा पोहोचला 21 वर
एकूण रुग्ण...
धुळे शहरात १४
साक्री ४
शिरपूर, २
शिंदखेडा १
२१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे.