धुळे -जिल्ह्यातील शिरपूर येथील 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्या १०९ वर पोहोचली आहे.
धुळ्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू, एकूण मृतांचा आकडा १४ - धुळे कोरोना अपडेट
धुळे जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जिल्ह्यात 109 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून शिरपूर येथील 2 जणांचा सोमवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा 14 झाला असून 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जिल्ह्यात 109 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून शिरपूर येथील 2 जणांचा सोमवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा 14 झाला असून 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद न देता नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३ हजार ४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १ हजार १९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.