महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्याचे 'मरकझ' कनेक्शन; 15 जणांचे अहवाल प्रतिक्षेत

दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी मरकझ या कार्यक्रमात जिल्ह्यातील काही मुस्लीम सहभागी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये 15 जणांचा समावेश असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे.

markaz in dhule
तबलिगी मरकझ या कार्यक्रमात धुळ्यातील काही मुस्लीम सहभागी असल्याचे समोर आले आहे.

By

Published : Apr 2, 2020, 5:24 PM IST

धुळे - दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी मरकझ या कार्यक्रमात जिल्ह्यातील काही मुस्लीम सहभागी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये 15 जणांचा समावेश असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. संशयितांचे अहवाल काही वेळात येण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दिल्लीत निजामुद्दीन येथे झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात पाच हजारांहून अधिक मुस्लिम धर्मीय सहभागी झाले होते. यातील काहीजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या २८ लोकांना देखील त्याची लागण झाली. आता याचं कनेक्शन धुळ्याशी असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

संबंधित कार्यक्रमात जिल्ह्यातील १५ जण सहभागी झाले होते. यातील ३ ते ४ जण शहरातील असून उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. या संशयितांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली आहे. शहरातील मोगलाई भागातून ४ जण आणि निजामपूर येथील ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणीसाठी नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संशयितांचे रिपोर्ट अद्याप आले नहीत. मात्र, आता ते संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details