महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे : कोरोनाबाधित रुग्ण संख्येने पार केला १ हजाराचा आकडा - धुळे कोरोना माहिती

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि. 28 जून) दिवसभरात 105 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 72 वर पोहोचली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

By

Published : Jun 29, 2020, 10:11 AM IST

धुळे -जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि. 28 जून) दिवसभरात 105 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 72 वर पोहोचली आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात 500 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोना वाढीचा वेग 71.42 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. यात शिरपूर तालुका आघाडीवर असून सर्वाधिक रुग्ण शिरपूर तालुक्यात आहेत.

धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून रविवारी (दि. 28 जून) दिवसभरात 105 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 72 वर जाऊन पोहोचली असून आतापर्यंत 507 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 509 जणांवर उपचार सुरू आहेत.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून शिरपूर तालुक्यात 240 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. धुळे जिल्ह्यात मागील आठवड्यात 500 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून रुग्ण वाढीचा वेग 71.42 टक्क्यांवर गेला आहे. धुळे शहरासोबत ग्रामीण भागात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये देखील वाढ झाली आहे.

एकीकडे कोरोनाचा उद्रेक वाढत असला तरीही नागरिकांकडून मात्र प्रशासनाच्या घालून दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, तरीही बाजारपेठांतील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. यावर प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा -धुळे : राष्ट्रवादीचे आमदार पडळकर यांच्या फोटोला 'जोडे मारो आंदोलन'

ABOUT THE AUTHOR

...view details