चंद्रपूर - कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी जिल्ह्यातील दिव्यांगांना आधार मिळावा. यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विधानाने पाऊल उचलले आहे. या माध्यमातून नोंदणीकृत प्रत्येक दिव्यांगाच्या बँक खात्यात पाचशे रुपये जमा होणार आहेत.
जिल्ह्यातील दिव्यांगांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार, प्रत्येकांच्या खात्यात होणार पाचशे रुपये जमा - lock down news chandrapur
कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातील अत्यल्प आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लोकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. उत्पन्नाचे साधन असलेले त्यांचे रोजगार बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक मदतीचा हात जिल्हा परिषदेने द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती नागराज गेडाम यांनी केली. त्यांच्या या मागणीला जिल्हा परिषदेकडूनही हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या 5 टक्के रक्कम दिव्यांगांकरता विकासात्मक बाबींवर खर्च करण्याची तरतूद आहे. 5 टक्के इतकी रक्कम खर्च करणे बंधनकारक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात (नगर पालिका/नगरपंचायत/महानगरपालिका वगळून) एकूण 5 हजार 639 दिव्यांग आहेत. या व्यतिरिक्त १८ वर्षाखालील दिव्यांगांची संख्या अंदाजे 1 हजार 400 इतकी आहे. सर्व वर्गवारीच्या दिव्यांगांची एकूण संख्या 7 हजार 39 इतकी होते. या सर्वांना कोरोना लॉकडाऊनच्या वेळी आर्थिक अचडणींवर मात करण्यासाठी पाचशे रूपयांची आर्थिक मदत ही मोठी मदत ठरू शकेल. हीच वेळ मदतीसाठी योग्य आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे.