चंद्रपूर -सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा गावात तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली. कमलेश चंदू सेडमाके असे मृत युवकाचे नाव आहे.
तलावात बुडून युवकाचा मृत्यू; सिंदेवाही तालुक्यातील घटना - चिकमारा गाव
सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा गावातील तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे.
मृत तरुण
हेही वाचा -पुणे : भोरगिरी येथील धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू
सिंदेवाही तालुक्यापासून 17 किलोमीटर चिकमारा गाव आहे. या गावालगतच्या तलावात कमलेश बुडालेल्या स्थितीत आढळला. सिंदेवाही पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन कमलेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयात पाठवला. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असून त्यांनी कलम 174 नुसार गुन्हा दाखल केला आहे.