चंद्रपूर - कोरपना-आदिलाबाद मार्गावर आज ( बुधवार ) दुपारचा सुमारास दुचाकीचा अपघात झाला. यात एक तरुण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रकाश बाबुराव जुमनाके (वय २२) असे मृताचे नाव आहे. जखमी झालेल्या सूरज दौलत सिडाम (वय २२) याला उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले आहे.
प्रकाश आणि सूरज हे दोघे लग्नासाठी मानोली गावाहून रुपापेठला निघाले होते. दरम्यान पारडीजवळ चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. मार्गालगत असलेल्या गिट्टीच्या ढिगावर दुचाकी आदळली. यात प्रकाश याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, सोबत असलेला सूरज हा गंभीररीत्या जखमी झाला.
कोरपना तालुक्यात दुचाकी अपघातात तरुण ठार, एक जण गंभीर
प्रकाश आणि सूरज हे दोघे लग्नासाठी मानोली गावाहून रुपापेठला निघाले होते. दरम्यान पारडीजवळ चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. मार्गालगत असलेल्या गिट्टीच्या ढिगावर दुचाकी आदळली. यात प्रकाश याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, सोबत असलेला सूरज हा गंभीररीत्या जखमी झाला.
चंद्रपूर अपघात
अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अरुण गुरनुले, पोलीस कर्मचारी अशोक मडावी, साईनाथ जायभाये घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी तरुणाला कोरपना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारांसाठी त्याला चंद्रपूरला हलवण्यात आले आहे. पुढील तपास कोरपना पोलीस करत आहेत.