गोंडपिपरी (चंद्रपूर) - शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला येथे शनिवारी (दि. 27 जून) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अविनाश संतोष मडावी (रा. विठ्ठलवाडा) असे मृतकाचे नाव आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील अविनाश मडावी हा आपल्या मित्रासह येनबोथला येथे शेतात गेला होता. शेतातून परत येताना येनबोथला येथील शेतकरी मैदनवार यांनी शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी पसरविलेल्या विजेचा प्रवाह असलेल्या विद्युत तारांना अविनाशचा स्पर्श झाला. यात अविनाशचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहीती गोंडपिपरी पोलीसांना देण्यात आली.