चंद्रपूर- रंगपंचमीला गुलाल उधळून नदीवर आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास पोंभूर्णा येथील अंधारी नदीपात्र परिसरात घडली. अखिल दिवाकर कामीडवार (वय.२७), असे मृत तरुणाचे नाव आहे.
चंद्रपुरात अंधारी नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू - akhil kamidwar died pobhurna
आज धुळवड साजरी करून अखिल आपल्या काही मित्रांसह अंधारी नदीपात्रात (भिमकुंड जवळ) आंघोळीला गेला होता. खोल पाण्याचा अंदाज न लागल्याने त्याचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला.
![चंद्रपुरात अंधारी नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू akhil kamidwar died pobhurna](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6362831-thumbnail-3x2-op.jpg)
मृत अखिल दिवाकर कामीडवार याचे छायाचित्र
अखिल दिवाकर हा पोंभूर्णा तालुक्यातील कवठी येथील रहिवासी असून मागील काही दिवसांपासून तो पोंभूर्णा येथे किरायाच्या घरात राहत होता. आज धुळवड साजरी करून अखिल आपल्या काही मित्रांसह अंधारी नदीपात्रात (भिमकुंड जवळ) आंघोळीला गेला होता. खोल पाण्याचा अंदाज न लागल्याने त्याचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील व बहीण आहे. पोंभूर्णा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.
हेही वाचा-कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या