चिमूर (चंद्रपूर) - नगर परिषद क्षेत्रातील ठक्कर वार्ड येथील साजन नामदेव मोहिनकर (वय-26 वर्ष) हा युवक मागील अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त होता. यातून आलेल्या नैराश्याने स्वतः च्या राहत्या घरात दुपारी दोनच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत राहणारा हा युवक लकवा या रोगाने ग्रस्त होता.
आजाराने त्रस्त युवकाची चिमूरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या - chimur police
नगर परिषद क्षेत्रातील ठक्कर वार्ड येथील साजन नामदेव मोहिनकर (वय-26 वर्ष) हा युवक मागील अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त होता. यातून आलेल्या नैराश्याने स्वतःच्या घरीच आत्महत्या केली.
![आजाराने त्रस्त युवकाची चिमूरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या young boy suicide](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6767069-503-6767069-1586702883479.jpg)
लकवा आणि इतर व्याधीने त्याच्यात नैराश्य आले ज्यामुळे दुपारच्या सुमारास आई आणि बहीण घराबाहेर शेजारी गेल्यावर खुंटीला दोर बांधून आत्महत्या केली. काही वेळाने आई घरी आली असता, तिने पाहिले. त्यानंतर तिने आरडाओरड करून शेजाऱ्यांना सांगितले. घटनेची माहिती चिमूर पोलीस ठाण्याला कळवण्यात आली.
चिमूर पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक रविंद्र खैरकर, पोलीस हवालदार देविदास रणदिवे घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आले. पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर करीत आहेत.