चंद्रपूर - राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तसेच पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्रालय, ( Ministry of Environment ) भारत सरकार यांच्यावतीने 29 जुलै रोजी वन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे जागतिक व्याघ्र दिन ( World Tiger Day ) साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंदर यादव ( Union Environment Minister Bhupendra Yadav ) , केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे ( Union Minister of State Ashwini Kumar Choubey ) तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
World Tiger Day : जागतिक व्याघ्रदिनी केंद्रीय पर्यावरण मंत्री चंद्रपुरात; अधिकाऱ्यांचा करणार सत्कार - World Tiger Day celebrated in Chandrapur
भारत सरकार यांच्यावतीने 29 जुलै रोजी वन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे जागतिक व्याघ्र दिन ( World Tiger Day ) साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तसेच पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्रालय यांच्या ( Ministry of Environment ) वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंदर यादव ( Union Environment Minister Bhupendra Yadav ) उपस्थित राहणार आहे.
खुल्या चर्चासत्राचे आयोजन - या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रसह इतर राज्यातून आलेले विशेष व्याघ्र संरक्षण दलाची ( Tiger Defense Force ) परेड, सलामी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 29 जुलै रोजी वन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची 21 वी बैठक, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची 69 वी सभा तसेच मंत्री महोदयांसोबत देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक यांच्यासोबत खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते 11.45 मिनिटांपर्यंत हा कार्यक्रम सुरू असणार आहे. विषेश म्हणजे पर्यावरण संवर्धन तसेच व्याघ्र संवर्धन करताना उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील निवडक अधिकाऱ्यांना यावेळी पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते पुरस्कृत केले जाणार आहे.