चंद्रपूर- राजुरा तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. महिलेच्या आत्महत्येला चार तासही उलटले नाही तोच वेकोलीतील कामगाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कामगाराने रामपूर गावालगत असलेल्या जंगलातील झाडाला गळफास घेऊन आज आत्महत्या केली. बंडू नथू मालेकर (वय.५५) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
राजुरा तालुक्यात खाण कामगाराची आत्महत्या; सलग चौथ्या घटनेने तालुका हादरला - chandrapur
प्राप्त माहितीनुसार बंडू मालेकर हे वेकोलीच्या सास्ती भूगर्भ खाणीत सामान्य मजदूर म्हणून कार्यरत होते. त्यांची रात्रपाळीत ड्यूटी असल्याने ते घरीच होते. आज ते घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर रामपूर गावालगत असलेल्या जंगलातील लिंबाच्या झाडाला मालेकर यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
प्राप्त माहितीनुसार बंडू मालेकर हे वेकोलीच्या सास्ती भूगर्भ खाणीत सामान्य मजदूर म्हणून कार्यरत होते. त्यांची रात्रपाळीत ड्यूटी असल्याने ते घरीच होते. आज ते घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर रामपूर गावालगत असलेल्या जंगलातील लिंबाच्या झाडाला मालेकर यांनी गळफास घेतल्याचे शेळ्या राखणाऱ्याला दिसून आले. शेळ्या राखणाऱ्याने याबाबत गावाकऱ्यांना माहिती दिली. मालेकर यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा आप्त परिवार आहे. या घटनेने रामपूर गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, राजुरा तालुक्यात ३ दिवसात ४ आत्महत्या झाल्याने तालुका हादरला आहे.
हेही वाचा-चंद्रपुरमध्ये युवकाची विष पिऊन आत्महत्या