महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Agitation against Governer Statement : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महिला संघटनांचा आक्रोश

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी एका भाषणात शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर त्यांच्यावर राज्यभरातुन टीका करण्यात आली. विधानसभेत देखील या वक्तव्याबाबत गदारोळ झाला.

By

Published : Mar 17, 2022, 5:38 PM IST

Chandrapur
Chandrapur

चंद्रपूर :राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (MH Governer Controversial statement) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहे. याविरोधात आज महिला संघटनांनी आंदोलन करून राज्यपाल यांचा निषेध व्यक्त केला. यावर राज्यपालांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महिला संघटनांचा आक्रोश
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी एका भाषणात शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर त्यांच्यावर राज्यभरातुन टीका करण्यात आली. विधानसभेत देखील या वक्तव्याबाबत गदारोळ झाला. चंद्रपूर जिल्ह्यात देखील राज्यपाल यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आले.

चंद्रपूरमध्ये तीव्र निदर्शने

यासाठी सावली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. पोंभुण्यात देखील याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले होते. आज त्यांच्या नेतृत्वाखाली विविध महिला संघटनांनी चंद्रपुरात निदर्शने केली. शिवाजी महाराज यांच्या शिल्पकृतीच्या स्थानी हे आंदोलन करण्यात आले. 'राज्याचे राज्यपाल कोश्यारी हे खोटा इतिहास रुजवू पाहत आहे. यासोबतच महापुरुषांच्या बाबत ते अत्यंत अवमानकारक भाषेचा उपयोग करतात. त्यांची ही कृती अत्यंत आक्षेपार्ह असून त्यांनी नैतिकतेच्या दृष्टीने त्वरित राजीनामा द्यायला हवा,' अशी मागणी डॉ. गावतुरे यांनी केली. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. गावतुरे यांनी दिला.
हेही वाचा -VBA Protest Against Fertilizer Price Hike : खतांचे दर वाढण्याची शक्यता.. वंचित बहुजन आघाडीचे 'पुंगी बजाव' आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details