चंद्रपूर - शेतात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकहल्ला केल्यामुळे महिला शेतमजुराचा मृत्यू झाला. सरिता श्रीकृष्ण पाल असे या मृतक महिलेचे नाव असून ती 34 वर्षांची होती. ही घटना सावली वनविभागांतर्गत येणाऱ्या मोरवाडी या गावात घडली.
वाघाच्या हल्ल्यात महिला शेतमजूर ठार, मोरवाई गावातील घटना - वाघाचा हल्ल्यात महिला शेतमजूर ठार, मोरवाई गावातील घटना
शेतमजूरी करणाऱ्या महिलेवर अचानक वाघाने हल्ल्या केल्यामुळे तीला आपला जीव गमवावा लागला. चंद्रपूर जिल्ह्यात ही घटना घडली.
मूल तालुक्यातील मोरवाई-बेलघाटा या मार्गावरील शेतात काम करीत असताना अचानक वाघाने हल्ला केला. शेतात सरिता एकटीच काम करीत होती. वाघाने सरीतावर हल्ला केला, त्यावेळी शेजारच्या शेतात इतर महिला काम करीत होत्या. परंतु केवळ महिलाच असल्याने त्या सगळ्या घाबरून गेल्या. वाघाने अचानकपणे हल्ला केल्याने स्वाबचावासाठी सरिताला संधीच मिळाली नाही. तिने आरडाओरडा केला.
मोरवाई-बेलघाटा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचा कामावर असलेल्या मजुरांना सरीताचा ओरडण्याच्या आवाज आला. ते सगळे आवाजाचा दिशेने धावत गेले. मात्र तो पर्यंत वाघाने सरीताचे प्राण घेतले. लोक धावून आल्याने वाघ तिथून पळून गेला. मोरवाई गावाला जंगल लागून असल्याने वाघासह इतरही हिंस्त्र प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. मृतक महिलेचा पती ट्रॅक्टरवर हमालीचे काम करतो.