महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ड्युटी फर्स्ट; पाच वर्षाच्या चिमुकल्याला सोडून महिला पोलीस मुंबईत तैनात, आईला भेटण्यास मुलगा आतुर

कर्तव्य सर्वतोपरी हे स्वतःला समजावत या आईने काळजावर दगड ठेवत आपल्या मुलाला सोडले. आज ही महिला पोलीस मुंबईत आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुठल्या दुः ख, वेदना, त्यागाला समोर जावे लागते याचेच हे उदाहरण आहे.

चंद्रपूर
चंद्रपूर

By

Published : Apr 17, 2020, 4:16 PM IST

Updated : Apr 17, 2020, 5:23 PM IST

चंद्रपूर - कशाबशा सुट्ट्या काढून ती आई मुलाला भेटायला गावी आली होती. त्याच वेळी कोरोनाने देशात हातपाय पसरायला सुरुवात केली होती. त्यामुळे तडकाफडकी तिला मुंबई येथे तैनात व्हायचे होते. आपल्या पोलीस आईला सोडायला वडिलांसोबत पाच वर्षांचा अथर्वदेखील आला होता. 'आई आता तू कधी येणार?' हे विचारल्यावर आईने एप्रिल महिन्यात सुट्या लागल्यावर तूच मुंबईला येशील असे उत्तर दिले. मात्र, पुढे येणारी परिस्थिती कठीण आहे, हे तिलाही माहिती होते. मात्र, कर्तव्य सर्वतोपरी हे स्वतः ला समजावत या आईने काळजावर दगड ठेवत आपल्या मुलाला सोडले. आज ही महिला पोलीस मुंबईत आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुठल्या दुः ख, वेदना, त्यागाला समोर जावे लागते याचेच हे उदाहरण आहे.

चंद्रपूर

रुपाली अरविंद राऊत ह्या मुंबई पोलीस विभागात तैनात आहेत. त्यांचे मूळ गाव चिमूर तालुक्यातील चिचाळा शास्त्री हे आहे. पती शेती करतात. त्यांना पाच वर्षांचा अथर्व नावाचा मुलगा देखील आहे. तो वडिलांकडे असतो. रुपाली ह्या सुट्या मिळाल्या तर गावाकडे येतात. राज्याच्या एका टोकावर कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या आईला भेटायला अथर्व नेहमी आतूर असतो. आईने एप्रिल महिन्यात सुट्या लागल्यावर मुंबईतच येशील, असे सांगितले होते. आता अथर्व वारंवार आपल्या वडिलांना मुंबईत कधी जायचं विचारत असतो. रात्री आईशी फोनवर बोलताना देखील तो हेच विचारत असतो. आई त्याची समजूत काढत म्हणते सध्या सर्वत्र कोरोना असल्यामुळे सर्व रेल्वे गाड्या बंद आहेत. त्या सुरू झाल्या की माझ्याकडे ये, अशी समजूत ती आपल्या मुलाला घालते. अथर्व देखील आपल्या आईला तोंडाला मास्क लावत जा, हात धूत, जा अशा सूचनादेखील करतो. हे ऐकून अनेकदा या आईच्या डोळ्यात पाणी येते. कधी कधी भावना उफाळून आल्याने अथर्व देखील वडिलांकडे आईकडे जाऊया, असा तगादा लावतो. त्याला त्याची समजूत घालणे वडिलांना देखील कठीण होऊन जाते. या लॉकडाउनमुळे सेवा देणाऱ्यांना अशाच काहीशा दिव्यातून जावे लागत आहे.

Last Updated : Apr 17, 2020, 5:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details