महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारचाकी नाल्यात पडल्याने महिलेचा मृत्यू ; चालकाचा ताबा सुटल्याने अपघात - four wheeler accident in chandrapur

नागपूरहून चंद्रपूरकडे येताना चालक महिलेचे नियंत्रण सुटल्याने तुकूमजवळील भडगा पुलावरून चारचाकी थेट नाल्यात कोसळली. या अपघातात 21 वर्षांच्या युवतीचा मृत्यू झाला असून अन्य एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे.

chandrapur accident news
चारचाकी नाल्यात पडल्याने महिलेचा मृत्यू ; चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

By

Published : Dec 1, 2020, 3:21 PM IST

चंद्रपूर - ताडोबा सफारीसाठी येणाऱ्या एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. नागपूरहून चंद्रपूरकडे येताना चालक महिलेचे नियंत्रण सुटल्याने तुकूमजवळील भडगा पुलावरून चारचाकी थेट नाल्यात कोसळली. या अपघातात 21 वर्षांच्या युवतीचा मृत्यू झाला असून अन्य एक पुरुष गंभीर जखमी आहे. या अपघातात चारचाकीचा चुराडा झाला आहे.

चारचाकी नाल्यात पडल्याने महिलेचा मृत्यू ; चालकाचा ताबा सुटल्याने अपघातचारचाकी नाल्यात पडल्याने महिलेचा मृत्यू ; चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

चिमूर तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा गेटमार्फत सफारीसाठी येण्यास पर्यटकांची पंसती आहे. यासाठी वरुण गोयल कुटुंबातील चार महिला व दोन पुरुषांसह नागपूरहून ताडोबाच्या दिशेने निघाले.

तुकूम गावाजवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याजवळील पुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या महिला चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे चारचाकी थेट नाल्यात कोसळली. या गाडीखाली वीस वर्षांची युवती दबल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. अमिनेष गोयल वय (४२) वर्ष गंभीर जखमी झाले. तर इतरांना किरकोळ जखम झाली आहे. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details