चंद्रपूर -महिलेने नैराश्यातून स्वतःच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (रविवारी) उघडकीस आली आहे. दीपा रवींद्र पारधी (वय 33) असे मृतक महिलेचे नाव असून आयुष रवींद्र पारधी (वय 6) पियुष रवींद्र पारधी (वय 3) वर्ष असे मृतक बालकांचे नाव आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील पती रवींद्र मुरलीधर पारधी त्यांची पत्नी दीपा रवींद्र पारधी आयुष आणि पियुष हे कुटुंबातील दोन मुलांसह राहत होते. मात्र घटनेच्या अगोदरच्या रात्री पती रवींद्र व पत्नी दीपा यांच्यामध्ये वाद झालामुळे रागाच्या भरात पत्नी दीपा आपल्या दोन मुलांसह घरून निघून गेली. ही माहिती पती रवींद्रला कळताच त्यांनी नातेवाइक शेजाऱ्यांसह इतरत्र शोधाशोध केली असता पत्नी व दोन मुले आढळून आली नाही. मात्र आज 9 जानेवारीला ब्रह्मपुरीवरून मालडोंगरीकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत गावकऱ्यांना दीपा, आयुष व पियुष तिघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या सहकार्यातून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नेहमीच होणारे पती पत्नीतील वादाच्या जाचाला कंटाळत नैराश्यातून ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात असून परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास ब्रह्मपुरी पोलीस करत आहेत.
त्याच विहिरीत आढळला बिबट्याचा मृतदेह