महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरातही सुरक्षितता नाही, घरासमोर बसलेल्या वृद्धासह गावातील चिमुकलीवर रानडुकराचा हल्ला - chandrapur latest news

सध्या लॉकडाऊन असल्याने बहुतेक जण घरीच थांबले आहेत. या काळात वन विभागाचे बरेच कर्मचारीही आपआपल्या घरीच असल्याने वन्यजीवांपासूनचा धोका वाढला आहे, अशी चर्चा आहे.

चंद्रपुरात रानडुकराचा हल्ला
चंद्रपुरात रानडुकराचा हल्ला

By

Published : Apr 15, 2020, 1:29 PM IST

चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील दरूर येथे मंगळवारी सकाळी अचानकपणे एका रानडुकराने अंगणात बसलेल्या वयोवृध्दावर हल्ला केला. बाबुराव कोठारे असे या वृद्धाचे नाव असून ते जखमी झाले आहेत. याच रानडुकराने गावातील मनीषा गेडाम या 8 वर्षीय मुलीलाही धडक देत जखमी केले. या दोघांवरही गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तालुक्यातील दरूर गावात काल सकाळी अचानकपणे एक रानटी डुक्कर घुसले. आपल्या घराच्या समोरील भागात उभ्या असलेल्या मनीषा गेडाम या 8 वर्षांच्या चिमुकलीला त्याने धडक दिली. यानंतर लोक गोळा झाल्याने रानडुकराने धूम ठोकली. यानंतर बाबुराव कोठारे हे अंगणात बसलेले असताना त्यांच्यावरही या रानडुकराने हल्ला केला. हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने बहुतेक जण घरीच थांबले आहेत. या काळात वन विभागाचे बरेच कर्मचारीही आपआपल्या घरीच असल्याने वन्यजीवांपासूनचा धोका वाढला आहे, अशी चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details