Women suicide :पतीच्या कर्जबाजारीपणामुळे पत्नीची आत्महत्या
कर्जबाजारी (debtor) झाल्याने पतीने शेती विकली (To sell farmland) . पण कर्जाचा डोंगर कमी झाला नाही.कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने तिने बचतगटाकडून कर्ज (Loans from savings groups) घेतले. त्याच्या परतफेडीसाठी, तिला वडिलांकडून मिळालीलेली शेतजमीन विकण्याचा बेत होता. हा घाव तिच्या जिव्हारी लागला. या विवंचेत तीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
चंद्रपूर :ही दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे आज सकाळी उघडकीस आली. संध्या छत्रपती टोंगे ( ४५) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचे नाव आहे.संध्या ह्यांचे पती छत्रपती टोंगे हे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दलाल म्हणून कार्यरत आहे. या व्यवसायात त्याला अंदाज न आल्याने तो कर्जबाजारी झाला. त्याने उचल केलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वडिलोपार्जित शेत जमीन विकली. मात्र घरची परिस्थिती सुधारली नाही. पत्नी संध्या हिने पतीची दैना दूर व्हावी म्हणून बचत गट व अन्य लोकांकडून कर्ज उचल करून कुटुंबाचा गाढा पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अशातच संध्या हिला वडिलांकडून मिळणारी जमीन विकण्याची चर्चा घरी झाली. कर्जाच्या ओझ्याखाली आपली सगळी शेत जमीन विकण्याची वेळ आपल्यावर येत आहे. ही विवंचना संध्या हिच्या जिव्हारी लागली. अशातच तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. कुटुंबाला सावरताना तिने आत्मघताचा दुर्दैवी निर्णय घेतल्याने गावात हळहळ वक्त केली जात आहे.