चंद्रपूर Maratha Kunbi Records :मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात आता हालचाली सुरू झाल्या असून राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील कुणबी नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण राज्यभरात मराठा-कुणबीच्या नोंदी तपासल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा समितीच्या नोंदी तपासल्या जात आहेत. आतापर्यंत दीड लाख नोंदी तपासल्या गेल्या असून यामध्ये केवळ 22 जणांच्या मराठा-कुणबी म्हणून नोंदी समोर आल्या आहेत. (Chandrapur District Committee)
24 ऑक्टोबरपासून मोहीम :मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीच्या नोंदी शोधण्यासाठी 24 ऑक्टोबरपासून मोहीमेच्या माध्यमातून नोंदी तपासल्या जात आहेत. यामध्ये आतापर्यंत 1 लाख 77 हजार 924 नोंदींची तपासणी करण्यात आली. दरम्यान मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठाच्या एकूण 22 नोंदी आढळून आल्या आहेत.
मराठा-कुणबी, कुणबी-मराठाचे वर्गीकरण :एकूण 22 पैकी मराठा-कुणबी 17 तर कुणबी-मराठा 5 अशा नोंदी आढळून आल्या आहेत.
13 शासकीय विभागातून तपासणी :जिल्हा समितीकडून 13 शासकीय विभागातीळ जुन्या नोंदणी तपासल्या जात आहेत. यामध्ये महसूल, जन्म-मृत्यू, शैक्षणिक अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा कारागृह, मुद्रांक विभाग, भूमी अभिलेख, सैनिक कल्याण कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि अन्य दोन विभागांचा समावेश आहे.