महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Boar Blocked In Pipeline : जंगली डुकराने अडवला दहा गावांचा पाणीपुरवठा; तब्बल दोन दिवस पुरवठा ठप्प

दोन दिवसांपूर्वी एक जंगली डुक्कर पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये अडकले. (boar blocked in pipeline). या डुकराला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे, मात्र यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थ महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (wild boar blocked Water supply).

Boar Blocked In Pipeline
Boar Blocked In Pipeline

By

Published : Nov 13, 2022, 5:59 PM IST

चंद्रपूर - एका जंगली डुकराने तब्बल दहा गावांचा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून अडवला आहे. (wild boar blocked Water supply). ही आश्चर्याची घटना घडली आहे गोंडपीपरी तालुक्यातील धाबा या गावात. पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये जंगली डुक्कर अडकले आणि त्यामुळे हा पुरवठा ठप्प पडलेला आहे. (boar blocked in pipeline). त्यामुळे गावातील नागरिकांना विहिरीतून पाणी भरावे लागत आहे.

जंगली डुकराने अडवला दहा गावांचा पाणीपुरवठा

डुक्कर मृतावस्थेत अडकलेले आहे - गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावात ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. या माध्यमातून लगतच्या दहा गावांना पाणीपुरवठा केला जातो. कंत्राटी पद्धतीने ही योजना चालविली जाते. मात्र याचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने केले जात नाही. कंत्राटदाराकडून याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे पाणी पुरवठा अनेक वेळी ठप्प होत असतो. दोन दिवसांपूर्वी एक जंगली डुक्कर पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये अडकले. पाणीपुरवठा करणाऱ्या हौदात जंगली डुकराचे पिल्लू अडकले. भेदरलेल्या अवस्थेत हे पिलू थेट पाईपलाईनमध्ये अडकले. पाणी सोडून देखील गावांत पाणी पोचले नाही, दुसऱ्या दिवशी देखील हाच प्रकार झाला. यानंतर कंत्राटदाराच्या माणसाने पाहणी केली असता एक जंगली डुक्कर पाईपलाईनमध्ये अडकून असल्याचे आढळून आले. हे डुक्कर मृतावस्थेत अडकलेले आहे. आता या डुकराला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे, मात्र यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थ महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ग्रामपंचायतने केली कंत्राटदाराची तक्रार -दहा गावांना पाणीपुरवठा करणारी जी योजना कार्यान्वित आहे ती कंत्राटदारामार्फत चालवली जाते. आता या योजनेच्या पाईपलाईनमध्ये डुक्कर अडकलं आहे. आधी देखील अनेक कारणामुळे अधूनमधून या योजनेचा पाणीपुरवठा बंद असतो. ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक तक्रारी केल्या आहेत. संबंधित ठेकेदाराकडून योजना काढून घेण्यात यावी, अशा मागणीचं पत्र देखील धाबा ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेला दिलं होतं, मात्र अद्याप यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details