चंद्रपूर - बारा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धाबा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद पडल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तीन दिवसांपासून गावातील नळाला पाणी येत नसल्याने ते कोरडे पडले आहे. सार्वजनिक विहिरीवर महिलांची तोबा गर्दी उसळली आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपिट सुरू असल्याने गावकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. तर या योजनेत समाविष्ट असलेल्या काही गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नसल्याने नाल्यात खड्डे खोदून तेथील गढूळ पाण्याने तहान भागविली जात आहे.
क्षुल्लकशा तांत्रिक कारणाने धाबा प्रादेशिक पाणी पुरवठा मागील चार दिवसांपासून बंद आहे. परिणामी या योजनेत समाविष्ट असलेल्या बारा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ओस पडलेल्या विहिरीवर महिलांची तोबा गर्दी उसळली आहे. विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून सार्वजनिक विहिरींमध्ये ब्लिचींग टाकण्यात आलेला नाही. धाबा योजनेत समाविष्ट असलेल्या कोंढाणा, बेघर या गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाही. गावापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या नाल्यात खड्डा खोदून तेथील गढूळ पाण्याने गावकरी तहाण भागवत आहेत. यामुळे गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चंद्रपूर : ऐन उन्हाळ्यात बारा गावात भीषण पाणी टंचाई - धाबा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बातमी
चंद्रपूर जिल्ह्यातील बारा गावांना पाणी परुवठा करणाऱ्या धाबा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने या गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी भर उन्हात भटकावे लागत असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पाण्यासाठी विहिरीजवळ झालेली गर्दी
आपल्या व्यथा मांडताना ग्रामस्थ
धाबा योजना ठेकेदारा मार्फत चालविली जाते. सबंधित ठेकेदाराचे योजनेकडे कमालीचे दूर्लक्ष झालेले आहे. किरकोळ त्रृटींमुळे अधूनमधून योजना बंद पडत असते. ठेकेदाराचा अनेक तक्रारी गावकरी, ग्रामपंचायतीने केलेल्या आहेत. मात्र, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ठेकेदाराला नेहमीच पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा -लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र-तेलंगणाचा प्रेमबंधात कोरोनाने टाकला मिठाचा खडा