महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिनिंग मालकाची पत्रकाराला धक्काबुक्की...दोघांवर गुन्हा दाखल - चंद्रपूर गुन्हा बातमी

पत्रकाराशी शेतकऱ्यांना बातचीत करताना बघून जिनिंगचे मालक सौरभ आणि शुभम या दोन्ही भावांनी भडके यांच्याकडे धाव घेतली. भडके यांच्या दुचाकीची चावी हिसकावली. अरेरावी करत धक्काबुक्की केली.

vrindavan-jining-owners-push-back-to-journalist-in-chnadrapur
जिनिंग मालकाची पत्रकाराला धक्काबुक्की..

By

Published : Jun 12, 2020, 4:36 PM IST

चंद्रपूर- वृंदावन जिनिंगच्या मालकाकडून पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचा प्रकार गोंडपिपरीत घडला आहे. या प्रकरणी गोंडपीपरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात विविध कलमान्वे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जिनिंग मालकाची पत्रकाराला धक्काबुक्की..
एका वृत्तवाहीणीचे गोंडपीपरी येथिल प्रतिनिधी राजकपूर भडके हे गुरुवारी सायंकाळाच्या सुमारास आपल्या दुचाकीने तारसा येथे घराकडे जात होते. दरम्यान, रस्त्यालगत असलेल्या वृंदावन जिनिंग जवळ शेतकऱ्यांचा गोंगाट दिसला. काय प्रकार आहे हे बघण्यासाठी भडके त्या ठिकाणी थांबले. त्यांना बघून काही शेतकरी त्यांचाकडे येवून आपली समस्या सांगू लागले. पत्रकाराशी शेतकऱ्यांना बातचीत करताना बघून जिनिंगचे मालक सौरभ आणि शुभम या दोन्ही भावांनी भडके यांच्याकडे धाव घेतली. भडके यांच्या दुचाकीची चावी हिसकावली. अरेरावी करत धक्काबुक्की केली. दोन्ही भावांचा तावडीतून भडके यांनी स्वतची कशीबशी सुटका करुन घेतली. गोंडपिपरी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनेबद्दल तक्रार दिली. भडके यांच्या तक्रारीवरुन गोंडपिपरी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.मुजोरी वाढली...सुमारे दोन वर्षांपासून विठ्ठलवाडीजवळ चंद्रपुरातील पंकज अग्रवाल यांनी वृंदावन जिनींग सुरू केली. आपल्या तालुक्यात जिनींग सूरू होत असल्याने वेळ व पैशाची बचत होईल यामुळे परिसरातील बळीराजा आनंदी होता. पण जिनींगगचे मालकपुत्र सौरव व शुभम अग्रवाल या यांनी जिनींगमध्ये दादागिरी सुरू केली असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांशी असभ्य वागणूक करणे, ग्रेडरला हाताशी घेत कापूस खराब असल्याचा बहाना करित कमी भाव देणे, असा प्रकार नेहमीचाच याठिकाणी घडत आहे. याकडे प्रशासनाचाही कानाडोळा आहे. त्यामुळे अग्रवालची मुजोरी वाढतच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हिन वागणूक देत त्यांची फसवणूक करणाऱ्या अग्रवालवर कठोर कार्यवाही करुन जिनींग बंद करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यानी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details