चंद्रपूर - राजुरा तालुक्यातील विरुर पोलिसांच्या धडक मोहीमेला सलग चौथ्या दिवशी यश आले आहे. आज केलेल्या कारवाईत 5 लाख 77 हजार 250 रुपयांची गावठी दारू व सडवा पोलिसांनी जप्त केला. तर 6 आरोपीना अटक करण्यात आली आहे.
कोरोना लाॕकडाऊनचा लाभ घेत विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारुविक्री जोरात सूरु आहे. अवैध दारु विक्री विरोधात विरुर पोलिसांनकडून धडक मोहीम राबविली जात आहे. 3 दिवसात पोलिसांनी लाखोंचा दारुसाठा जप्त केला आहे. आज ( शुक्रवार ) पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 5 लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर या कार्यवाहीत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सलग चौथ्या दिवशी विरुर पोलिसांची कारवाई, 5 लाख 77 हजारांचा दारुसाठा जप्त - सलग चौथ्या दिवशी विरुर पोलिसांची कारवाई
राजुरा तालुक्यातील विरुर पोलिसांच्या धडक मोहीमेला सलग चौथ्या दिवशी यश आले आहे. आज केलेल्या कारवाईत 5 लाख 77 हजार 250 रुपयांची गावठी दारू व सडवा पोलिसांनी जप्त केला.
सलग चौथ्या दिवशी विरुर पोलिसांची कारवाई,
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी ,उपनिरीक्षक सदानंद वडतकर यांनी केली. दरम्यान, आरोपी राजू परमार, रवी भुक्या, प्रकाश कोडापे, बाजीराव भडके, प्रमोद भटारकर, ओदेलू लिंगमवार या आरोपींना अटक करण्यात आली आहे. विरुर पोलिसांच्या धडक मोहीमेमुळे दारु विक्रेते धास्तावले आहेत.