चिमूर (चंद्रपूर) -केंद्र शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजनांची अंमलबजावणी विषयीचा अभ्यास करण्याकरीता केंद्रीय ग्रामविकास संसदीय स्थायी समितीने २० आगस्टला सकाळी कोलारा ग्राम पंचायतीला खासदार नारायणभाई रठवा यांचे नेतृत्वात भेट दिली. केंद्राच्या विविध योजना ग्राम पातळीवर राबविल्या जातात की नाही, यात येणाऱ्या अडचणी याविषयी माहीती घेण्याकरीता समीतीचा हा अभ्यास दौरा असल्याचे नारायणभाई रठवा यांनी सांगितले.
समितीत कोण?
या समितीमध्ये खासदार सुजित कुमार, खासदार अजय प्रतापसिंग, खासदार दुबे यांच्यासह संयुक्त सचिव देशराज शेखर, कार्यकारी अधिकारी अतुल यांचा समावेश होता. प्रधानमंत्री सडक योजना आणि विविध योजना या भागात कार्यन्वित का झाल्या नाहीत, याबाबतही यावेळी विचारणा करण्यात आली.