माहिती देताना विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार चंद्रपूर : Vijay Wadettiwar : राज्य सरकारनं ६ सप्टेंबरला एक शासन निर्णय काढला होता. यात सर्व शासकीय नोकर्या या कंत्राटी पद्धतीनं भरल्या (Contract Basis Vacancies) जाणार असून, यासाठी खासगी ९ संस्थांना नोकर भरतीबाबतचे कंत्राट देण्यात आलंय. राज्यातील तरूणांना देशोधडीला लावणारा हा शासन निर्णय असल्यानं तरुणांनो या शासन निर्णयाची होळी करुन मोर्चे काढा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar On Contract Basis Job) केलंय.
शासन निर्णयाची होळी करा : राज्यातील ५ लाख १४ हजार जागा भरण्याचं कंत्राट खासगी संस्थांना दिलंय. जवळपास अडीच हजार कोटी रूपयाची लूटमार या संस्था करणार आहेत. त्यामुळं तरूणांनो आता पेटून उठा आणि शासन निर्णयाची होळी करा, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलंय. ओबीसी समाजानं काढलेल्या मोर्चानिमित्त ते चंद्रपुरात आले असताना, त्यांनी पत्रकार परिषदेत हे आवाहन केलंय.
ओबीसींच्या वाट्यातून मराठयांना आरक्षण नको :ओबीसी समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय घ्यावा, त्यांच्या मागण्या रास्त आहेत. मात्र, सरकार फार काही निर्णय घेईल अशी आशा नाही. मात्र, ओबीसींच्या वाट्यातून मराठयांना आरक्षण (Maratha Reservation) देऊ नये, अशी आमची मागणी आहे. यासोबतच कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Caste Certificate) सरसकट मराठा समाजाला देणं चुकीचं आहे, असेही ते म्हणाले. सरकारनं त्वरीत यासंदर्भात तोडगा काढावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
आरक्षण मर्यादा वाढविण्याचा निर्णय : यासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार असून, आम्ही बोलण्याआधी त्यांनी ओबीसींचं उपोषण सोडवण्यास यावं, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या हैदराबाद येथील बैठकीत काही ठराव घेण्यात आले. त्यात प्रामुख्यानं जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव घेण्यात आलाय. ओबीसींसाठी ५० टक्क्याहून अधिक आरक्षण मर्यादा (OBC Reservation) वाढवण्याचा निर्णय घेतला. तसेच ज्यांची जितकी संख्या तितके आरक्षणात वाटा असा ठराव काँग्रेसनं घेतला आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास या ठरावाची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे यावेळी वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा -
- Devendra Fadnavis on OBC Reservation : ओबीसींच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येणार नाही - देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
- Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंच्या उपोषणात लाठीचार्जपासून मुख्यमंत्र्यांची भेट, वाचा १७ दिवसात झालं तरी काय....
- Maratha Reservation: रात्री उशिरा जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद...एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांना काय सांगितलं?