महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'फडणवीसांनी 5 वर्षे महाराष्ट्राला तेल लावायचे काम केले'

चिमूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. सतिश वारजुरकर यांच्या प्रचारासाठी नागभिड येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेचे प्रमुख अतिथी अखिल भारतिय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक होते.

विजय वडेट्टीवार

By

Published : Oct 12, 2019, 9:47 PM IST

चंद्रपूर- आम्ही मैदानात तेल लावून उतरले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस सांगतात. मात्र, त्यांनी ईव्हीएमचे तेल लावले आहे, भ्रष्टाचाराचे तेल लावले, बेरोजगारीचे तेल लावले, नुसती लुटालुट केली. त्यांनी महाराष्ट्राला 5 वर्षे तेल लावण्याचेच काम केले. त्यामुळे स्वतःला आणि शेतकऱ्यांना तेल लावणाऱ्या या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते नागभिड येथे आयोजित काँग्रेसच्या प्रचार सभेत बोलत होते.

विजय वडेट्टीवार, विधानसभा विरोधी पक्ष नेते

हेही वाचा - निवडणुकीच्या तोंडावर भाजपला राम मंदिर आठवतेय - सूभाष धोटे

चिमूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. सतिश वारजुरकर यांच्या प्रचारासाठी नागभिड येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेचे प्रमुख अतिथी अखिल भारतिय काँग्रेस कमेटीचे महासचिव मुकुल वासनिक अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, चिमूरचे उमेदवार डॉ. सतीश वारजूकर, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, ज्येष्ठ नेते पंजाबराव गावंडे ,पंचायत समिती सभापती रवी देशमुख, जि.प.चे माजी उपाध्यक्ष गोविंद भेंडारकर, प्रफुल्ल खापर्डे, खोजराम मरस्कोल्हे, गोपाल दडमल, मनोहर रामटेके हे यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details